Skip to main content

रंगभूमी, स्वत:चं गाणं आणि सायकल- वसुंधरा कोमकली

कलकत्ता ते देवास. या प्रवासात हातातून अलगद निसटून गेलेल्या गोष्टी... रंगभूमी, स्वत:चं गाणं आणि सायकलिंग. त्या पकडून ठेवणं, माझ्याच हातात होतं!... कुमार गंधर्वांच्या आजच्या ८८व्या जयंतीनिमित्ताने राहून गेलेल्या गोष्टींना उजळा देत आहेत प्रसिध्द गायिका वसुंधरा कोमकली

आयुष्य कसं वळण घेईल सांगता नाही येत! तसंच आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर हातातून काय निसटेल, त्याचाही अदमास नाही येत. पण कधी ना कधी, काही ना काही निसटतं, हेच अंतिम सत्य! मग ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तरीही कधीतरी एकांतक्षणी ती रुखरुख उचंबळून येते... नि मन एकदम आताच्या कोलकात्यात आणि तेव्हाच्या 'कलकत्त्या'त धाव घेतं.

मी माहेरची श्रीखंडे. माझे वडील टाटांच्या सेवेत म्हणजे टाटा कंपनीत होते. तेव्हा आमचं वास्तव्य कलकत्त्यालाच होतं. माझा नि माझ्या सर्व भावंडांचा जन्म तिथलाच. तेव्हाचं कलकत्ता म्हणजे एकदम सांस्कृतिक शहर. साहित्य, चित्र आणि संगीत, सर्वच ललितकलांचं माहेरघर. विशेषत: कलकत्ता म्हणजे तेव्हा भारतीय संगीताचं मोठं केंद होतं. साहजिकच आमच्या घरातही सांस्कृतिक बहार होती. आई कलकत्त्यातील मराठी समाजात एकदम अॅक्टिव्ह होती. तर माझा मोठा भाऊ मनोहर हौशी नाटकवेडा आणि संगीतवेडा होता. खरंतर एकूणच सांस्कृतिक माहौलमध्ये वाढल्यामुळे आम्ही सर्वच भावंडं कलावंत निपजलो. दादा कलाप्रेमी होताच, पण माझी बहीण प्रभा दिलरुबा वाजवायची; तर धाकटा भाऊ तबला. माझं सुरुवातीचं गाणंही तिथेच आकाराला आलं. एवढं की, वयाच्या अवघ्या बाराव्या वषीर् मी कलकत्त्याच्या 'ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स'सारख्या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायले होते आणि त्यात पहिला पुरस्कार म्हणून मला चांदीची छोटी तंबोरी मिळाली होती.

या पुरस्काराचा मला खूप फायदा झाला. एकदा कोलकात्याच्या आकाशवाणीवरील बुजुर्ग रेडिओ आटिर्स्टस्नी संप केला. तेव्हा रेडिओने कोलकात्याच्या संगीतसभेत गायलेल्या बालगायकांनाच बोलावलं. त्यात माझीही वणीर् लागली आणि मी लहान वयातच रेडिओ आटिर्स्ट बनून गेले. सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण तिथल्या माझ्या गायनात, तबलावादक म्हणून मला प्रसिद्ध तबलावादक अल्लारखाँ साहेब यांची साथ लाभली होती.

त्याच दरम्यान एकदा कलकत्त्याच्या संगीतसभेत बालकलाकार म्हणून नावाजलेल्या कुमार गंधर्वांचं गाणं झालं. कुमारजींचं वय तेव्हा १९-२० असेल. पण त्यांची गाण्याची तयारी हुकमी होती. मला स्वत:ला त्यांचं गाणं खूप आवडायचं. त्यांच्याकडे गाणं शिकावं असंही मला वाटून गेलं होतं. त्यामुळेच कलकत्त्याच्या संगीत सभेतील कुमारजींच्या गाण्याची संधी साधून माझ्या थोरल्या भावाने एके दिवशी त्यांना आमच्याकडे जेवायला बोलावलं. आणि नंतर गप्पा मारता मारता त्यांच्याकडे मला गाणं शिकवण्याचा विषयही काढला. विशेष म्हणजे कुमारजीही लगेच तयार झाले. फक्त त्यांची अट एकच होती- त्यासाठी मला मुंबईला यावं लागेल. कारण त्यांचा मुक्काम मुंबईत ऑपेरा हाऊसला प्रो. बी.आर. देवधर यांच्या 'देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक'मध्ये होता.

योगायोगाने तशी संधीही चालून आली. १९४२ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. कलकत्ता हे ब्रिटिशांचं मुख्य केंद असल्यामुळे तिथे युद्धाचे वारे वाहू लागले. त्या दरम्यान कलकत्त्यातील अनेक मराठी कुटुंब पुन्हा महाराष्ट्रात परतली. आम्हीही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आलो. यामागे मला कुमारजींंकडे गाणं शिकता यावं, हाही एक उद्देश होता आणि तसंच झालं. मी प्रो. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाले. पण तिथे जाऊन पाहते तर काय, कुमारजींचे सतत संगीताचे दौरेच चाललेले. मग देवधरमास्तरांनीच मला शिकवायला सुरुवात केली. मुंबईत असतील तेव्हा कुमारजीही शिकवयाचे. पण मुंबईच्या मुक्कामात माझं संगीतशिक्षण मुख्यत: झालं ते देवधरमास्तरांकडेच.

एकीकडे माझं स्वत:चं हे संगीतशिक्षण सुरू असतानाच, मी शिवाजी पार्कला माझा संगीतक्लास सुरू केला होता आणि एका शाळेत संगीतशिक्षिका म्हणूनही काम करत होते. ही साधारणपणे १९५१-५२ची गोष्ट असेल. त्याचवेळेस नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर मुंबई मराठी साहित्य संघासाठी पु. ल. देशपांडे यांचं 'भाग्यवान' हे नाटक करत होते. त्यासाठी त्यांना एका गायिका-अभिनेत्रीची गरज होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. खरंतर आईचा विरोध होता, पण दादाचा म्हणजे मोठ्या भावाचा पाठिंबा होता. त्यामुळे मी 'भाग्यवान'मध्ये काम केलं. माझं काम नावाजलंही गेलं. विशेष म्हणजे तेव्हा पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंशी जो स्नेह जुळला, तो अखेरपर्र्यंत टिकून राहिला. या नाटकानंतर चिंतामणरावांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा एक अंक बसवला होता. त्यातही मला मुख्य भूमिका होती...

... मात्र माझ्यासाठी रंगभूमीचं एक अनोखं दालन उघडलं गेलं असताना आणि नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांसारखा माणूस माझ्या पाठिशी असतानाही, मी तिथे रुजू शकले नाही. कदाचित आईला तेव्हा नाटकात काम करणं वगैरे फार आवडायचं नाही म्हणून असेल, किंवा माझ्या संगीताच्या वेडाने या नाट्यवेडावर मात केली की काय कुणास ठाऊक? पण तिथे नाटक माझ्या हातून निसटलं ते निसटलंच. मग त्याने कायमचीच हुलकावणी दिली. आता वाटतं, तेव्हा जरा जोर लावून नाटक करायला हवं होतं. संगीत रंगभूमीची दुसरी इनिंग तेव्हा सुरू होत होती. तिथे मी माझी हक्काची स्वतंत्र जागा नक्कीच निर्माण करू शकले असते. पण...

जे नाट्यक्षेत्राच्या बाबतीत झालं, तेच माझ्या संगीताबाबतही झालं. आता लोक मला ज्येष्ठ गायिका म्हणून ओळखतात. गेल्या पंधरा-वीस वर्षांत मी स्वतंत्रपणे अनेक मैफलीही केल्या. पण गळ्यात गाणं असतानाही ऐन उमेदीत मला माझं संगीत जपता-वाढवता आलं नाही, याचं आता वाईट वाटतं.

कुमारजींच्या पत्नीचं भानुताईंचं १९६१मध्ये निधन झालं. त्यानंतर १९६२मध्ये कुमारजींशी माझा विवाह झाला आणि मी मुंबई सोडून मध्यप्रदेशात देवासला आले. इथे आले आणि विस्कळीत झालेलं घर-कुटुंब सावरताना, मुकुलला लहानाचं मोठं करताना माझं गाणंच हरवून बसले. अर्थात याविषयी माझी तक्रार नाही. पण संगीताचा तळपता सूर्य घरात असताना, वास्तविक माझं गाणं वाढायला हवं होतं. गाण्यात मला स्वतंत्रपणे काही करण्याची संधी मिळायला हवी होती. मात्र तसं झालं नाही. मला स्वत:ला गायचंय, असं कुमारजींना सांगण्याची हिंमतच मला झाली नाही. किंबहुना त्यांच्यासमोर गाण्याची कायम भीतीच वाटत राहिली. आता वाटतं, उमेदीच्या वयात संगीताबाबतही थोडा जोर मी लावायला हवा होता. स्वत:चं गाणं स्वतंत्रपणे वाढवायला, मांडायला हवं होतं. उतारवयात ते केलं खरं, पण उमेदीच्या काळात माझ्या हातून ते निसटलंच.

अजून एक भन्नाट गोष्ट आहे, जी शिकता आली नाही म्हणून माझ्या मनाला अद्याप रुखरुख लागून राहिली आहे. ती म्हणजे मला कधीच सायकल चालवता आली नाही. देवासला आल्यावर मी इथल्या शाळेत शिकवायला लागले. त्यावेळी देवासला वाहनांची व्यवस्था नव्हती. त्यामुळे शाळेत रोज चालत जावं लागायचं. शेवटी मी सायकल शिकायची ठरवलं. त्यासाठी सायकल आणून घराच्या परिसरात ती चालवायलाही शिकले. परंतु तिच्यावर बसून शाळेत जाताना पहिल्याच दिवशी मी पडले आणि पुन्हा म्हणून सायकलचं नाव काढलं नाही. आता वाटतं तेव्हा पुन्हा मी सायकल शिकायला हवी होती. म्हणजे मला नंतरच्या काळात कुणावर विसंबून राहावं लागलं नसतं. मनात आलं की सायकलवर बसून पाहिजे तिथे जाता आलं असतं. बाहेर नेण्यासाठी मुलांची वाट बघण्याऐवजी माझी मीच गेले असते सायकलवर बसून भुर्रर्र...अजून वयाच्या ८१व्या वषीर्ही मला तसंच वाटतं.

... असा कलकत्त्यापासून देवासपर्र्यंत झालेला प्रवास आणि या प्रवासात हातातून अलगद निसटून गेलेल्या एकेक गोष्टी...त्या पकडून ठेवणं, जपणं माझ्याच तर हातात होतं! पण म्हटलं ना, आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर हातातून कधी काय निसटेल याचा अदमासच येत नाही म्हणून...!


Comments

Popular posts from this blog

हमें सत्य के शिवालो की और ले चलो

आभा निवसरकर "एक गीत ढूंढ रही हूं... किसी के पास हो तो बताएं.. अज्ञान के अंधेरों से हमें ज्ञान के उजालों की ओर ले चलो... असत्य की दीवारों से हमें सत्य के शिवालों की ओर ले चलो.....हम की मर्यादा न तोड़े एक सीमा में रहें ना करें अन्याय औरों पर न औरों का सहें नफरतों के जहर से प्रेम के प्यालों की ओर ले चलो...." मैंने भी ये गीत चित्रकूट विवि से बी एड करते समय मेरी सहपाठिन जो छिंदवाडा से थी के मुह से सुना था मुझे सिर्फ यही पंक्तिया याद है " नफरतों के जहर से प्रेम के प्यालों की ओर ले चलो...." बस बहुत सालो से खोज जारी है वो सहपाठिन शिशु मंदिर में पढाती थी शायद किसी दीदी या अचार जी को याद हो........? अगर मिले तो यहाँ जरूर पोस्ट करना अदभुत स्वर थे और शब्द तो बहुत ही सुन्दर थे..... "सब दुखो के जहर का एक ही इलाज है या तो ये अज्ञानता अपनी या तो ये अभिमान है....नफरतो के जहर से प्रेम के प्यालो की और ले चलो........"ये भी याद आया कमाल है मेरी हार्ड डिस्क बही भी काम कर रही है ........आज सन १९९१-९२ की बातें याद आ गयी बरबस और सतना की यादें और मेरी एक कहानी "सत...

संसद तेली का वह घानी है जिसमें आधा तेल है आधा पानी है

मुझसे कहा गया कि सँसद देश को प्रतिम्बित करने वाला दर्पण है जनता को जनता के विचारों का नैतिक समर्पण है लेकिन क्या यह सच है या यह सच है कि अपने यहाँ संसद तेली का वह घानी है जिसमें आधा तेल है आधा पानी है और यदि यह सच नहीं है तो यहाँ एक ईमानदार आदमी को अपने ईमानदारी का मलाल क्यों है जिसने सत्य कह दिया है उसका बूरा हाल क्यों है ॥ -धूमिल

चम्पा तुझमे तीन गुण - रूप रंग और बास

शिवानी (प्रसिद्द पत्रकार सुश्री मृणाल पांडेय जी की माताजी)  ने अपने उपन्यास "शमशान चम्पा" में एक जिक्र किया है चम्पा तुझमे तीन गुण - रूप रंग और बास अवगुण तुझमे एक है भ्रमर ना आवें पास.    बहुत सालों तक वो परेशान होती रही कि आखिर चम्पा के पेड़ पर भंवरा क्यों नहीं आता......( वानस्पतिक रूप से चम्पा के फूलों पर भंवरा नहीं आता और इनमे नैसर्गिक परागण होता है) मै अक्सर अपनी एक मित्र को छेड़ा करता था कमोबेश रोज.......एक दिन उज्जैन के जिला शिक्षा केन्द्र में सुबह की बात होगी मैंने अपनी मित्र को फ़िर यही कहा.चम्पा तुझमे तीन गुण.............. तो एक शिक्षक महाशय से रहा नहीं गया और बोले कि क्या आप जानते है कि ऐसा क्यों है ? मैंने और मेरी मित्र ने कहा कि नहीं तो वे बोले......... चम्पा वरणी राधिका, भ्रमर कृष्ण का दास  यही कारण अवगुण भया,  भ्रमर ना आवें पास.    यह अदभुत उत्तर था दिमाग एकदम से सन्न रह गया मैंने आकर शिवानी जी को एक पत्र लिखा और कहा कि हमारे मालवे में इसका यह उत्तर है. शिवानी जी का पोस्ट कार्ड आया कि "'संदीप, जिस सवाल का मै सालों से उत्तर खोज रही थी व...