मराठी के यशस्वी कवि मंगेश पाडगांवकर का देहांत हो गया है। नमन और श्रद्धांजलि। उनकी तीन रचनायें जो मुझे बेहद पसन्द है। **************** एक - सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा! डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना? ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना? शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा! काळ्याकुट्ट काळोखात जेंव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन ऊभं असतं काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा! पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं? काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तुम्हीच ठरवा! पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा! सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा! ***** दो - प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, ...
The World I See Everyday & What I Think About It...