लोक म्हणतात की जे प्रेम आपल्याला कधीच मिळालं नाही, ते आपण इतरांना देऊ शकत नाही. पण आमच्या आईने तिच्या आयुष्यातून हे वाक्य पूर्णपणे खोटं ठरवून दाखवलं आहे. लहानपणीच आईचं छत्र हरवल्यामुळे आईची माया आणि तिची ऊब काय असते, हे तिला कधी experience करता आलं नाही. पण आज ती स्वतः एक best Aai आणि अत्यंत प्रेमळ Aaji म्हणून आम्हा सर्वांना तेच प्रेम देते आहे.
जबलपूरमध्ये जन्मलेली ती लहानशी मुलगी आज दोन मुलं, दोन सुना आणि तीन नातवंडांचं संपूर्ण जग बनली आहे.
घराची मोठी सून म्हणून तिच्यावर खूप expectations होत्या, पण तिने प्रत्येक नातं — सून, पत्नी, वहिनी आणि आई — अतिशय प्रेमाने आणि patience ठेवून निभावलं.
काही दिवसांपूर्वी Daddy च्या retirement वेळी आम्ही सर्वांनी आमचं प्रेम व्यक्त केलं. पण Aai साठी तसं कधीच नसतं. Aai can never retire! उलट काळानुसार तिच्या जबाबदाऱ्या आणि काम वाढतच गेलं आहे.
आज आम्ही निर्धास्तपणे घराबाहेर पडून आमच्या career कडे लक्ष देऊ शकतो, आमची स्वप्नं पूर्ण करू शकतो, तर त्यामागे Aai चा sacrifice आणि तिचा खंबीर support आहे.
Aai ला स्वतःला job करायची खूप इच्छा होती, पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला ते जमलं नाही. म्हणूनच तिने ensure केलं की तिच्या सुनांना मात्र आपली स्वप्नं जगताना कोणतीही अडचण येऊ नये.
आज त्या दोघी मोठ्या post वर काम करतायत, तर त्याचं सगळं credit Aai लाच जातं; कारण ती घर आणि नातवंडं इतक्या सुंदर पद्धतीने manage करते आहे.
Sharwil, Shatakshi आणि Arnika साठी तर त्यांची Aaji आणि Aajoba म्हणजे त्यांचं पूर्ण जग आहे. ते सोबत असले की त्यांना दुसऱ्या कोणाचीही आठवण येत नाही.
Aai, तू आमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने backbone आहेस. आमचं success, आमचं सुख आणि आमचं अस्तित्व — हे सगळं फक्त तुझ्यामुळेच आहे. Tu aahes mhanun aamhi aahet.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू अशीच नेहमी सुखात आणि आनंदात राहा.
तुझा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे.
"
_______
Comments